Choice Codes DTE - DSE Auto(630760210), Mech(630761210), Comp (630724510), IT(630724610), E&TC(630737210), Civil(630719110) ** DSE Separate Div Auto (630760280) & Computer (630724580) ** ME Heat Power (630759610), ME Machine Design (630761920) | MBA (630710110) | Fee Structure for 2018-2019 announced! Visit this link! | View our National Institutional Ranking Framework (NIRF) Data here!

ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, राष्ट्रीय सेवा योजेनेच्या वतीने ढोले पाटील ऐज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. सागर उल्हास ढोले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या साठी आंतर महाविद्यालयीन पथ नाट्य स्पर्धेचे आयोजन दि. २१ फेब्रुवारी २०१८ रोजी करण्यात आले. या स्पर्धेसाठी एकुण १२ महाविद्यालयानी सहभाग घेतला व विविध सामाजिक व ज्वलंत विषयावर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

            सदर स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री सागर ढोले पाटील यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी संस्थेच्या सेक्रेटरी सौ. उमा ढोले पाटील, प्राचार्य सिद्धराज अल्लुरकर, परीक्षक श्री. प्रदीप खैरे, श्री.रुपेश जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकांत जगताप यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवराज पवार, सचिन गरकळ, शिवानंद हिरेमठ, दिग्विजय राऊत, भालचंद्र ढाणे, विनायक आघाव यांनी परिश्रम घेतले.

            स्पर्धेचा निकाल:-

  • प्रथम पारितोषिक – सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग
  • द्वितीय पारितोषिक – एच. व्ही. देसाई कॉलेज
  • तृतीय पारितोषिक – नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स
  • उत्कृष्ट लेखक – अक्षय पाटील
  • उत्कृष्ट दिग्दर्शक – रितेश ढुबे
  • उत्कृष्ट अभिनेता – अक्षय पाटील
  • उत्कृष्ट अभिनेत्री – गौरी कनोजवार.