Congratulations!!! Team Screwdrivers For Biggest Achievement - Overall 1st Rank in National Level FMAE FFS 2018 Competition at Coimbatore | View our National Institutional Ranking Framework (NIRF) Data here!

                                खराडी भागातील अनेक विध्यार्थी,पालक,ज्येष्ठ नागरिक व इतर रहिवासी यांच्यासाठी पी. एम. पी.एम.एल. ने दि १७.१०.२०१८ पासून पुणे स्टेशन ते ढोले पाटील कॉलेज अशी बससेवा सुरु केली आहे. यामुळे येथील सर्वांचीच वाहतुकीची सोय झाली आहे.
ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रागंणात पी. एम. पी.एम.एल. च्या पुणे स्टेशन ते  ढोले पाटील कॉलेज बससेवेच्या उदघाटनास मा. सिध्दार्थ शिरोळे, चेअरमन पी. एम. पी.एम.एल, आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार बापुसाहेब पठारे, माजी महापौर उल्हास ढोले पाटील , माजी आमदार कमलताई ढोले पाटील, नगरसेविका सौ.संजिला बापु पठारे ,सौ. सुमन पठारे व नगरसेवक मा. भैय्यासाहेब जाधव,पी. एम. पी.एम.एल.चे कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच खराडी भागातील रहिवासी,ज्येष्ठ नागरिक,विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
                    ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. सागर उल्हास ढोले पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले व महाविद्यालयाचे विध्यार्थी भविष्यात पी. एम. पी.एम.एल.ला सर्वोतोपरी सहकार्य करतील अशी ग्वाही दिली.