Congratulations!!! Team Screwdrivers For Biggest Achievement - Overall 1st Rank in National Level FMAE FFS 2018 Competition at Coimbatore. Fee Structure for 2018-2019 announced! Visit this link! | View our National Institutional Ranking Framework (NIRF) Data here!

ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करते . अभियांत्रिकी कॉलेज असुनही अनेक सांस्कृतिक उपक्रम यशस्वीरीत्या येथे आयोजीत केले जातात. महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये स्थापन करण्यात आलेलला गणपती मंदिरामध्ये गणेशउत्सवात  वेगवेगळे  उपक्रम आणि स्पर्धा  आयोजीत केल्या जातात. त्यातील एक स्पर्धा म्हणजे गौरी गणपती सजावट स्पर्धा. संस्थेचे चेअरमन सागर उल्हास ढोले पाटील यांच्या संकल्पनेतुन सुरु झालेल्या या स्पर्धचे  हे तिसरे वर्ष होते. कॉलेजमधील विद्यार्थी व  कॉलेजच्या जळपासच्या परिसरातील नागरिकांसाठी या स्पर्धेचे आयोजन कॉलेज गणपती मंदिर व विध्यार्थी यांच्या मार्फत केले जाते. या  स्पर्धेमध्ये ११० जणांनी सहभाग घेतला. संस्थेच्या सेक्रेटरी सौ. उमा सागर ढोले पाटील या आयोजन कमिटीच्या प्रमुख होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. स्वप्नील धावडे व इतर शिक्षकांनी स्पर्धेचे नियोजन केले.

                    स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येकाला आकर्षक भेटवस्तू व विजेत्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.४ ऑक्टॉबर रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन सागर उल्हास ढोले पाटील उपस्थित होते. या प्रसंगी  सेक्रेटरी सौ. उमा सागर ढोले पाटील यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले व सर्वांचे आभार मानले.