देशसेवा अंगिकारणारे अभियंते घडायला हवेत

ब्रिगेडीयर भाटिया ; प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्याचे स्वागत

पुणे : आज अभियांत्रिकी शिक्षण घेऊन अभियंते बनणारे असंख्य विद्यार्थी आहेत परंतु त्यातील किती अभियंते देशसेवा अंगिकारणारे आहेत.केवळ अभियंता हा ठपका लावून घेणे आणि त्या माध्यमातून आपल्या व्यावसायाची जपणूक करणारेच मला जास्त दिसतात आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाचा देशाला,समाजाला उपयोग झाला पाहिजे अशी वृत्ती अभियंता होऊ पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने बाळगली पाहिजे.असे मत ब्रिगेडीयर डॉ.रणधीर भाटीया यांनी व्यक्त केले.वाघोली येथील ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्याचा स्वागत समारंभ आयोजीत करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सागर ढोले पाटील होते.यावेळी प्राचार्य डॉ.सतीश आलमपल्लेवार,उपप्राचार्य डॉ.अभिजीत दंडवते,महाविद्यालयाच्या व्यवस्थापिका प्रा.कांचन पुजारी,प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ.सचिन राजस,प्रा.प्रकाश माळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा.अनिल दरेकर,प्रा.डॉ.विनोद कुलकर्णी यांनी केले तर सुत्रसंचलन अभिजीत आंतरे,मिनाक्षी ठाकूर,रोहित आंगरे,नेहा झा यांनी,आभार कुलदीप पढलीया या विद्यार्थ्यानी मानले.