Fee Structure for 2018-2019 announced! Visit this link! | View our National Institutional Ranking Framework (NIRF) Data here!

एस ए ई सुप्रा हि ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक अनोखी स्पर्धा असून त्यात विद्यार्थ्यांना एक सिंगल सीटर रेस कार Conceive, Design and Fabricate करायची असते. सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिर्स इंडिया आणि मारुती सुझुकी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हि स्पर्धा दरवर्षी बुद्ध इंटरनॅशनल सर्किट ग्रेटर नोएडा येथे आयोजित केली जाते या स्पर्धे मध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून सुमारे १२६ इंजिनीरिंग कॉलेज च्या टीम्स भाग घेत असतात. विद्यार्थ्यांना हि रेस कार आंतरराष्ट्रीय दर्जानुसार आणि आयोजकांनी दिलेल्या नियमावली च्या पात्रतेनुसार बनवावी लागते. ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या “टीम स्क्रुड्राइव्हर्स” ने या वर्षी दिमाखदार कामगिरी करत देशाभरातून आलेल्या १२३ टिम्समधून अव्वल ०७ वा तर महाराष्ट्रातून अव्वल ०३ रा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धे मधील अत्यंत कठीण असे सर्व स्थर पार करत “टीम स्क्रुड्राइव्हर्स” ने कॉलेज चे नाव देशस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर झळकवले. विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जा मानके समोर ठेवून बनवलेली हि रेस कार ११० किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाने धावू शकते.

“टीम स्क्रुड्राइव्हर्स” चे नेतृत्व तृतीय वर्ष स्वयंचलित अभियांत्रिकीमध्ये शिकणाऱ्या संकेत कुबडे नि केले असून त्यासोबत भीमाशंकर दावणीपुरगे, कुणालसिंग राजपूत, अजय तितमें, विक्रम शिंगाडे, जयेश रेंगे, रवी जाधव, शुभम बाकडे, चैतन्य कुंभार, कुणाल बागुल, रोनक राठोड, विनीत, मंजुनाथ, कृष्णा, हर्षल, किशन इत्यादीची मोलाची साथ होती. शिक्षक सल्लागार (फॅकल्टी अॅडवायझर) म्हणून प्रोफेसर जगदिश बायस आणि प्रोफेसर माहेश्वर च. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

संस्थेचे चेअरमन श्री. सागर ढोले पाटील, सेक्रेटरी सौ. उमा ढोले पाटील आणि प्राचार्य डॉक्टर. अभिजित दंडवते यांनी त्यांना वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन केले.