ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस “वाचन प्रेरणा दिवस” म्हणून दिनांक १४.१०.२०१७ रोजी सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे विचार, त्यांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. श्री. मिलिंद लेले यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती विविध साहित्य या विषयी मार्गदर्शन केले, त्यांच्या कलाकृतीवर विद्यार्थ्यानी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच भारतातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथील उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
 
ह्या क्षणी विद्यार्थी व महाविद्यालयाच्या प्राध्यापक वर्गाने त्यांच्या कविता, कथा यांचे अभिवाचन केले तसेच आपल्या आवडत्या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले. वाचन प्रेरणा दिवसाचे औचीत्या साधून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा” या उपक्रमाचे महाविद्यालयाच्या प्रांगणात उद्घाटन करण्यात आले. प्राध्यापक प्रकाश माळी यांनी विंदा करंदीकर यांच्या अजरामर साहित्याची विद्यार्थांना जवळून ओळख करून दिली.
 
वाचन प्रेरणा दिवस कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री. सागर उल्हास ढोले पाटील, सेक्रेटरी सौ. उमा सागर ढोले पाटील, प्राचार्य डॉ. अभिजित दंडवते उपस्थित होते त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. विद्यार्थांनी वाचन प्रेरणा दिवसाचे औचीत्या साधून “अग्निपथ” या आत्मचरित्राचे सामुहिक वाचन करून कार्यक्रमाची सांगता झाली.