Dhole Patil College of Engineering is proud to announce that we have been awarded A+ with 3.38 CGPA by the National Assessment and Accreditation Council (NAAC) | DPCOE has received Rotary Professional Excellence Award – Best College Award in Education (Urban) Congratulations! | View our National Institutional Ranking Framework 2019 (NIRF) Data here! | Congratulations!!! Team Screwdrivers For Biggest Achievement - Overall 1st Rank in National Level FMAE FFS 2018 Competition at Coimbatore

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबीर दि. ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०१८ या कालावधीत मु. पो. मळद ता. दौंड, जि. पुणे येथे पार पडले. ‘ सर्वांगिण ग्रामिण विकास ’ या संकल्पनेतून विध्यार्थ्यानी सात दिवस श्रमदान करून ग्रामस्वच्छता शोषखड्डे, दोन वनराई पद्धतीचे बंधारे, सिमेंटच्या बंधाऱ्याची दुरुस्ती, स्मशान भुमी स्वच्छता, धार्मिक स्थळांची स्वच्छता केली. तसेच पाणी फाउंडेशन, इंडिअन रेड क्रॉस सोसायटी यांच्या माध्यमातून व्याखानाचेआयोजन केले. ‘ प्राथमिक उपचार प्रशिक्षण ‘ आयोजित करण्यात आले. व्यक्तिमत्व विकास शाळाबाह्य मुलांचे प्रश्न, बाल मेळावा, स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात आले. ३५० विध्यार्थ्याची मोफत आरोग्य तपासणी ससुन रुग्णालयाच्या डॉक्टर्स टिमच्या वतीने करण्यात आली.

विविध सामाजिक विषयावर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. मळद गावाचे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामस्थांनी विध्यार्थ्याच्या या सामाजिक योगदानाबद्दल गौरव केला. ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, सर्वेक्षण, पर्यावरण जागृती, व्यसनमुक्ती, आरोग्य शिबीर, प्रभात फेरी असे विविध उपक्रम राबविले.

मा. सुभाष वाखारे, मा. चंद्रकांत गव्हाणे, मा. रोहित लोंढे, मा. महम्मद मुलानी, मा. सचिन परदेशी, मा. संजय चाकणे, मा. मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.

संस्थेचे चेअरमन मा. श्री. सागर ढोले पाटील, सेक्रेटरी सौ. ऊमाताई ढोले पाटील, प्राचार्य सिद्धराज अल्लुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकांत जगताप यांनी केले. शिबीर यशस्वी होण्यासाठी सचिन गरकळ, विनायक आघाव, युवराज पवार, शिवानंद हिरेमठ , कु.मयुरा पाटील, कु. वैष्णवी नवले यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *