सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा क्रिडा विभाग आणी ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली, यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा पार पडल्या. यामध्ये एकूण ५५ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून वाडिया महाविद्यालयाचे माजी शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक श्री. कुशाबा पिंगळे यांची उपस्थिती लाभली त्यांच्या आभारप्रदर्शनासाठी संस्थेचे चेअरमन माननीय श्री. सागर उल्हास ढोले पाटील, प्राचार्य डॉ. अभिजित दंडवते उपस्थित होते.
 
या स्पर्धेत अंतिम सामना टी. सी. बारामती विरुद्ध ए. आय. टी. दिघी यांच्या मध्ये रंगला. या रंगतदार सामन्याची सांगता टी. सी. बारामती महाविद्यालयाच्या विजयाने झाली.